अमरावती पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य यांची मुदत दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत असल्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम १ ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे. १ नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदार संघासाठी मतदार यादीचा कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाने घोषीत केला असून पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणुकी पुर्वी नव्याने (De-novo) तयार करणे आवश्यक असल्याने पात्र पदवीधरांना ७ नोव्हेंबरपर्यंत विहीत नमुन्यात (नमुना १८) पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रासह सादर करता येईल. या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त, अमरावती हे मतदार नोंदणी अधिकारी असुन सहायक मतदार नोंदणी अधिकारी जिल्हाधिकारी वाशिम हे आहेत. मतदार नोंदणीचे अर्ज हे पदनिर्देशीत अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिदार यांच्याकडे वर नमुद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सादर करता येतील.मतदार नोंदणीसाठी प्रथमच नमुना क्र १८ अर्जात आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तथापी आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्या वतीने ऐच्छीक आहे असेही आयोगाने स्पष्ट कलेले आहे.प्रत्येक व्यक्ती जी भारताची नागरीक आहे. आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी (म्हणजे पात्रता तारीख) किमान ३ वर्षे आधी भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहे.३ वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल, आणि तो विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधीकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासुन मोजण्यात येईल. पदवीधर मतदार यादीमध्ये नोंदणीकरीता मतदारांना नमुना १८ अर्ज इंग्रजी किंवा मराठीमध्ये सादर करता येईल सदर अर्ज तहसिल कार्यालयामध्ये तसेच मा. मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Download Form/Form-१८.pdf येथे सुध्दा उपलब्ध आहे.संबधीत शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा / कागदपत्रे पदनिर्देशीत अधिकारी / सहायक पदनिर्देशीत अधिकारी / संबधीत जिल्हातील राजपत्रित अधिकारी /नोटरी पब्लिक यांच्याकडुन प्रमाणीत केलेली असणेआवश्यक आहे.एकत्रित स्वरूपात अर्ज (Application in bulk) प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्विकारण्यात येणार नाहीत.तथापि, संस्था प्रमुख (Head of Institution) त्यांच्या संस्थेतील पात्र पदवीधर कर्मचा-याचे अर्ज एकत्रितरित्यासादर करू शकतात. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पदवीधर मतदारसंघासाठीचा नमुना क्र-१८ ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/ येथे उपलब्ध आहे. तसेच सदरची लिंक जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या रहिवासाठीचा पुरावा स्वयंसाक्षांकित असणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत जोडलेले शैक्षणिक अर्हतेबाबतचे कागदपत्र उदा. पदवो प्रमाणपत्र, गुणपत्रिका इत्यादि संबंधितपर्दानर्देशित अधिकारी / सहायक पदनिर्देशित अधिकारी/ जिल्यातील राजपत्रीत अधिकारी / नोटरी यांच्याकडून प्रमाणित करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपलोड करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची / कागदपत्राची

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

प्डताळणी त्याबाबतच्या मुळ प्रमाणपत्र/कागदत्रासोबत करून घेणे आवश्यक असल्याने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत क्षेत्रीय भेटीद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे.जेथे वरील कार्यपध्दती अनुसरण्यात आलेली नाही असा कोणताही अर्ज अपुर्ण समजून मतदारनोंदणी अधिका-यांकडून तात्काळ नाकारण्यात येईल.सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी.असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन चव्हाण यांनी केले आहे.