जिंतूर तालुक्यातील शेतकर्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आज दि 1 नोव्हेंबर मंगळवार रोजी तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले या बाबतीत प्रशासनाने सदर मागणी शासन दरबारी पाठवुन पाठपुरावा करणार व प्रमुख शेतकर्यांची बैठक लावुन समस्या जानुन घेण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. 

    या बाबत अधिक माहिती आशी की, जिंतूर तालुक्यातील सन 2018 साली 33% पेक्षा अधिक नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदत जाहीर केलेली होती परंतु त्यात काही मंडळाचे अनुदान रक्कम रुपये 63 कोटी 31 लक्ष रुपये अद्याप मिळाले नाही ते शेतकर्यांच्या खात्यात त्वरित जमा करावे, तालुक्यातील शेतकर्यांना पिक कापणी प्रयोगा आधारे 100% विमा रक्कम देण्यात यावी, जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये 35 दिवसाचा खंड पडला होता आणी मागिल महीण्यात आलेली सोयाबिन अतिवृष्टी मुळे गेली त्याचे पंचनामे करून प्रति एक्कर 13500 प्रमाणे 3 हेक्टर पर्यंत जाहीर केल्या प्रमाणे मदत त्वरित द्यावी या मागणी साठीचे निवेदन 26 सप्टेंबर रोजी व 17 आक्टोबर रोजी तहसिलदार जिंतूर यांना देऊन मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता आद्यापर्यंत या मागण्या मान्य न झाल्याने आज दि 1 सप्टेंबर रोज मंगळवार सकाळी 10:00 वाजल्या पासून तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी सदर मागण्या शासनदरबारी मांडणार आसुन त्याचा पाठपुरावा करून अडचणी जाणून घेण्यासाठी प्रमुख शेतकर्यांची बैठक बोलावनार आसल्याचे सांगितल्या नंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले या वेळी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत,गंगाधरराव नागरे, राजेंद्र नागरे,अविनाश काळे,ईरशाद पाशा,आर्जुन वजिर, केशवराव बुधवंत, मोबिन कुरेशी, रामजी घुगे, बासु पठाण,कृष्णा राऊत,लक्ष्मीबाई राठोड,शांताबाई बन, शांताबाई कानडे, पवन भालेराव,सुधाकर नागरे,मोहसिन पठाण,आनशल लाला,नवनाथ घुगे,आर्जुन वजिर, तहसिन देशमुख,कृष्णा टाकरस,रामप्रसाद माघाडे, महेश सांगळे, फेरोज मिस्त्री, रहेमान भाई, मुखिद भाई, रावसाहेब खंदारे, लखन कुरह्रे, राजू वैष्णव, कुरेशी,बाबु राज,प्रभाकर ईखे, रविकांत देशमुख,रवि होडबे, शिवाजी काळे, प्रभाकर कुर्हे, विलास देशमुख आदी उपस्थित होते.