चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत परशुराम घाटातून येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाने ३ ते ४ गाड्यांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाला. यामुळे वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. ट्रक चालकाविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडली. परशुराम घाटातातील या विचित्र अपघातात एका आयशर ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. नंतर फरशीवर एक कार, झायलो आणि वॅगनआरला धडक दिली. या धडकेत कारचा पत्रा अक्षरशः कापून काढला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एकाच वेळी अनेक वाहने अपघतग्रस्त झाल्याने घाटातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.