कृषिमंत्री .अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या सिंचन भवन येथे सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील विविध विकास कामां बाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शासनाच्या खाते निहाय आढावा घेतला.निजामकालीन बंधारे, पूर्णा नदीवरील बॅरेजेस उभारण्यासह मतदार संघातील सिंचन व्यवस्था व रस्त्यांची कामे गतिमान करण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करा, सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करा तसेच नवीन कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.बैठकीस माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता एस.के. सब्बिनवार  अभियंता अनिल निंबोरे, अशोक येरेकर कार्यकारी अभियंता PWD, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, उपविभागीय अभियंता यतीन कोठावळे, सिल्लोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय सोनुने आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती