भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त वाशीम जिल्हा पोलीस दलातर्फे नवीन पोलिसमुख्यालय (कवायत मैदान) वाशिम येथे एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते.या दौड मध्ये वाशीम पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवीला.
आज 31 ऑक्टोंबर रोजी भारताचे आयरण म्यान म्हणून ओळखल्या जाणारे लोहपुरुष देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती. त्यांचा जन्मदिवस भारतभर आपण राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतो .त्या निमित्ताने नवीन पोलीस मुख्यालय,वाशीम येथील कवयात मैदानावर एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये वाशीम जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अमलदार तसेच RCP व QRT चे जवान,वाशीम शहरातील जगदंबा अकादमी व कर्तव्य अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला.त्यामध्ये पुरुष गटातून प्रथम क्रमांक गौरव पोफळे,द्वितीय क्रमांक मयूर पंडित,तृतीय क्रमांक नामदेव भालेराव यांनी पटकविला.तर महिला गटातून प्रथम क्रमांक उषा बांगर,द्वितीय क्रमांक प्रियंका राठोड,तृतीय आचल वाकोडे यांनी प्राप्त केला.विजयी स्पर्धकांना राखीव पोलीस निरीक्षक मांगीलाल पवार यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय वाशीम येथे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त हारार्पण करुण अभिवादन केले.त्यावेळी राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर पोलीस अधीक्षक,वाशीम येथील अधिकारी व अंमलदारांनी राष्ट्राच्या एकता व अखंडतेचि शपथ घेतली.सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे,पो.नी.सोमनाथ जाधव,स्थानिक गुन्हे शाखा,वाशीम व पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच कर्मचारी उपस्थित होते.