कन्नड : ईशा झा यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल मारहाण झाल्याचे स्वता ईशा झा यांनी या व्हिडिओत म्हंटलेले आहे 

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांच्यासोबत कायम दिसाणाऱ्या ईशा झा यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. संशय घेऊन जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचे ईशा झा यांचे म्हणणे आहे. एका व्हिडीओतून ईशा झा यांनी आपबिती कथन केली आहे. याप्रकरणी कन्नड पोलिसात तक्रार दाखल केल्याचेही झा यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून जाधव यांच्यासोबत सावलीसारखी सोबत असणाऱ्या झा यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे