मराठवाड्यात यावर्षी जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टरचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता . दरम्यान यातून सावरत असतानाच सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरल्यासुरल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे . सप्टेंबर - ऑक्टोबर या दोन महिन्यात मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून , ज्याचा 28 लाख 76 हजार 816 शेतकऱ्यांना फटका बसला आहे . तर यासाठी 2479 कोटींची मदत अपेक्षित आहे . यावर्षी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे . मराठवाड्यात 727 मिमी पाऊस अपेक्षित असताना , यंदा 911 मिमी पाऊस झाला . म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या 125 टक्के पाऊस झाला आहे .