✍️Maharashtra lok24 news Jintur 📰
बोरी - येथील रहिवासी ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा यांची लोकशाही संघर्ष संघटनेच्या वाहतूक शाखेच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. संघटनेचे संस्थापक राष्ट्रिय अध्यक्ष अतुल महादेव नागरे पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्रक त्यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी श्री काळभोर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यामध्ये असलेला जनसंपर्क व कार्य पाहून नियुक्ती केली असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. या निवडीबद्दल ओम शर्मा यांचे राम मोरे, वाशिमकर, पवन झंवर, भुतडा, श्याम साखरे, सतीश कांबळे, शेख जहीर, सतीश ओझा, कनकुटे आदींनी अभिनंदन केले आहे...