रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावामधील प्रतिष्ठीत नागरीक श्री. हरीशचंद्र जयराम चव्हाण, यांच्या पत्नी सौ. शुभांगी हरीश्चंद्र चव्हाण यांचा ६० वा वाढदिवस त्यांच्या रहात्या घरी उत्साहात साजरा करण्यात आला.
सौ. शुभांगी चव्हाण या आरोग्य सेवेत गेली १५ वर्षाहून अधिक काळ स्त्री परीचर म्हणून नेवरे मालगुंड उपकेंद्र अंतर्गत विविध गावात वाडी-वस्तीवर जाऊन आरोग्य सेवा बजावत आहेत. त्यांना नेवरे ग्रामपंचायतच्या वतीने 'कोरोना योद्धा म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे. यातूनच त्यांचे काम आरोग्य सेवा म्हणून उत्कृष्ट असल्याचे पाहायला मिळते. सौ. शुभांगी हरीश्चंद्र चव्हाण यांच्या ६० व्यां वाढदीवसानिमित्त अनेकांनी निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, डॉक्टर्स, परीचारीका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका , मदतनीस पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, निरंकारी अंकगण व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.