अ‍ॅक्सीस बँकमधून बोलते, तुमचे क्रेडिट अपडेट करायचे आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरा असे म्हणत एकाने त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरताच खात्यातून तब्बल 1 लाख 98 हजार 4 रूपये कपात झाल्याचा एसएमएस आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिंद्रुड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना काल घडली.

नितीन शिवाजी तिडके (वय 35 रा.बोडखा ता.धारूर) या नौकरदाराला त्याच्या फोनवर अनोळखी महिलेचा फोन आला. मी अ‍ॅक्सीस बँक क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलते, तुमच्या क्रेडिट कार्डवर रिवार्ड पॉइंटवर ते रिडीम करण्यासाठी लिंक पाठवत आहे. तुम्ही मला कसलाही ओटीपी न सांगता ऑनलाईन फॉर्म भरा असे सांगितले. त्यावर तिडके यांनी विश्‍वास ठेवून ऑनलाईन फॉर्म भरला. ऑनलाईन फॉर्म भरताच त्यांच्या खात्यातून 1 लाख 98 हजार 4 रूपये कपात झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिडके यांनी त्यांनी दिंद्रुड पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.