कामचुकार डॉक्टर बनसोडे ची तात्काळ बदली करण्याची परिसरातुन ग्रामस्थांची मागणी

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल 55 खेडे तांडे वस्ती गावे असल्याने या ठिकाणी नेहमीच रुग्णांची गर्दी दिसून येते विशेष म्हणजे कुठलेही औषध गोळ्या पुरवठा नसल्याने या ठिकाणी वारंवार रुग्णांना खाजगी दवाखान्यात आधार घ्यावा लागतो, दवाखान्यात साध्या पित्ताच्या गोळ्या अथवा पोटाचे गोळ्या व इतर कुठल्याही गोळ्या बोटल भेटत नाहीत रुग्णांना वापस जावे लागत आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर बनसोडे हे नेहमीच गैरहजर राहत असल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे , विशेष म्हणजे दांडी बहाद्दर बनसोडे डॉक्टरची तात्काळ बदली करून नवीन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहणारे देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त काही कर्मचाऱ्यांचे पदे ही भरण्यात यावे व तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी देण्यात यावा आदी मागण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली असून तात्काळ जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर बनसोडे यांची बदली करून कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी निवासस्थानी देण्यात यावा नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी देवराज कोळे व गोपाल भैय्या चव्हाण यांनी इशारा दिला आहे यावेळी डॉक्टर बनसोडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही येथील ग्रामस्थ व रुग्णांना विचारले असता रुग्ण म्हणाले की नेहमीच बनसोडे व इतर डॉक्टर गैरहजर राहत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडले आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राला वाली आहे का नाही कोणी, जिल्हाधिकारी साहेब व तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका अधिकारी यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन, कामचुकार कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे