सर्वत्र मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली जात असताना मागील ४८ तासांमध्ये पाच जणांनी आत्महत्या केली . यातील चौघे अवघे १७ ते २१ वयोगटातील तरुण - तरुणी आहेत . नर्सिंगचे शिक्षण घेणारी कोमल रामसिंग जाधव ( १ ९ ) ही कुटुंबासह मुकुंदवाडीतील मुकुंदनगरात राहत होती . महिनाभरापूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने ती खचली होती . तेव्हापासून ती घरात शांत राहत होती . २७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता तिने खोलीत गळफास घेतला . कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करताच शेजारच्यांनी धाव घेतली . पोलिसांना कळवून योगेश राठोड , विजय पवार यांनी तिला घाटीत दाखल केले . मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता . दुसऱ्या घटनेत विशालनगरातील दिलीप विनायक घोडके ( ४६ ) यांनी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघरात गळफास घेतला . घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . तर बीड बायपास येथे राहणाऱ्या शेख आवेज शेख इमाम ( २१ ) या तरुणाने एमआयटीसमोरील अथर्व बिल्डर्सच्या साइटवर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली . याप्रकरणी सातारा पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे .चौथ्या घटनेत सिद्धार्थनगरातील प्रांजल संजय गायकवाड ( १७ ) हिने २७ ऑक्टोबर रोजी गळफास घेत आयुष्य संपवले . तिला घाटीत दाखल केले . मात्र , डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले . सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली . तर पाचव्या घटनेत धूत रुग्णालयासमोरील मूर्तिजापूर येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित भागवत शिंदे ( २० ) याने गळफास घेतला . ही घटना २६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
રાજકોટ:મોરબી ખાતે પૂલ તુટવાની દુર્ઘટના પગલે વિવિધ ટીમો રાજકોટ થી મોરબી મોકલવામાં આવી
રાજકોટ:મોરબી ખાતે પૂલ તુટવાની દુર્ઘટના પગલે વિવિધ ટીમો રાજકોટ થી મોરબી મોકલવામાં આવી રાજકોટ...
दिल्ली NCR में खालिस्तानी स्लीपर सेल एक्टिव, इंटेलिजेंस ने दी हमले की चेतावनी
दिल्ली में खालिस्तानी आतंकी किसी बड़ी वारदात के फिराक में हैं. इसके लिए आतंकी संगठन ने अपने...
Gujarat weather Forecast : ગુજરાતમાં આજથી 5 દિવસ રહેશે સામાન્ય વરસાદ | Rainfall Update
Gujarat weather Forecast : ગુજરાતમાં આજથી 5 દિવસ રહેશે સામાન્ય વરસાદ | Rainfall Update
Know the captains of All 16 teams of T20 World cup 2022
The world will witness one of the most exciting T20 World cup 2022 in Australia. Cricket...