नांदुरा:गेल्या ४ दिवसांपासून महाराष्ट्रासह नांदुरा तालुक्यात पावसाने कहर केला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अगोदरच महागडे बी, बियाणे, रासायनिक खते, औषधी यामुळे अगोदरच हवालदील झालेला शेतकरी आणि पिके जोमात असताना अचानक सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी कोमात जाण्याची वेळ आलेली आहे.कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याने उसनवारी करून शेती पेरली व पेरलेले पीक हाताशी येऊन शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावल्या गेला आहे.तरी आपण महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सरकार मायबाप म्हणून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन खात्यात जमा करावी. अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके, संपर्कप्रमुख सचिन गणगे,नांदुरा शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके,सुरेश पाटील,राहुल पाटील, मनस्कार,रोहन मनस्कार,अमोल भोलवनकर,योगेश सुरळकर,मधुसूदन पुंडकर,अमोल ढोले,अर्जुन वानखडे,सुभाष वानखडे,भूषण श्रीखंडे,पुरुषोत्तम वनारे, सय्यद एजाज,रामेश्वर काळे,पत्रकार किशोर इंगळे, संतोष तायडे,संतोष तायडे,पुरुषोत्तम वानखेडे व इतर शेतकरी उपस्थित होते.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं