दापोली : तालुक्यातील हर्णे आणि चांदिवणे या ठिकाणी पोलिसांनी बेकायदेशी दारु विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई केली. एकूण 4870 रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केला आहे. किशोर प्रकाश जाधव (43, हर्णे, गोडीबाव, दापोली), सदाशिव गजानन करमरकर (60, चांदिवणे, दापोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर जाधव याच्याकडे 1510 रुपयांची गावठी हातभट्टीची दारु व इतर साहित्य सापडले. तर सदाशिव करमरकर याच्याकडे 3660 रुपयांची संत्रा देशी दारु आणि इतर दारू तयार करण्यास लागणारा माल मिळून आला. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास घडली.