सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी 

• प्रशिक्षणाचे नाव 

• पोलीस भरती, मिल्ट्री भरती

 साठी उमेदवार पात्रता

1) महाराष्ट्र राज्याचा अनुसूचीत जाती (sc)मधील उमेदवार असावा.

2) उमेदवाराचे वय 19 ते 32 पर्यन्त असावे.

3) उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा.

4) महिला उमेदवारांची उंची किमान 155 से.मी. असणे आवश्यक आहे

5) पुरुष उमेदवारांना उंची किमान 165 से.मी. असणे आवश्यक आहे तसेच छाती किमान 79 से.मी. व फुगवून 79 +5 से.मी असणे आवश्यक आहे

6) पोलिस व मिल्ट्री भरतीच्या शारीरीक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागु राहतील.

अर्ज दाखल करावेत.अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा (screening test) घेण्यात येईल.

उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. तसेच एकूण उपस्थितीच्या दरमहा 75 टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये 6000/-विद्यावेतन (Stipend) देण्यात येईल. ४ महिने रोज प्रशिक्षण असेल. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुट व इतर आवश्यक साहीत्य खरेदी करण्याकरीता रु. 3000/- इतका निधी बार्टी मार्फत एक वेळ दिला जाईल. तसेच विद्यार्थ्यांना रु. 5000/- एवढ्या शुल्काचे अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी मार्फत देण्यात येईल.

        

• प्रशिक्षण वेळ

• बँक रेल्वे प्रशिक्षण कोर्स - बॅच 9.30 ते 1.30 व 2 ते 6 असेल

• पोलीस भरती बॅच वेळ

बॅच 1) 6 ते 11.30 

       6.00 ते 9.00मैदान 

        9 ते 11.30 लेक्चर   

बॅच 2) 2 ते 7

          2 ते 4 लेक्चर 

          4 ते 7 मैदान 

• अर्जासोबत आणावयाची कागदपत्रे

१)१०वी,१२वी,पदवी मार्कलिस्ट,प्रमाणपत्र झेरॉक्स 3 प्रति

२) SC Caste जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स 3 प्रति

३)आधारकार्ड झेरॉक्स 3 प्रति

४)शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला झेरॉक्स 3 प्रती

५)पासपोर्ट आकाराचे ४ फोटो

६)स्वतःच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया याच बँकेत खाते अकाऊंट असले पाहिजे. त्याच खाते पुस्तकाची रंगीत झेराॅक्स 3 काॅपी विद्यावेतन साठी आवश्यक आहे सहा हजार रूपये यावर जमा होतात.

वरील सर्व कागदपत्रे स्व-साक्षांकित करुन वेगवेगळ्या सेटमध्ये द्यावीत.

2)बँक रेल्वे ,तलाठी सरकारी नोकर भरती IBPS, lic, इत्यादी

• प्रशिक्षण कालावधी 6 महिने - एप्रिल 2023 बॅचसाठी प्रवेश सुरू 

 2) बँक IBPS, Railway, lic साठी उमेदवार पात्रता

1) महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती (sc) मधील उमेदवार असावा.

2) वय 18 ते 34 पर्यंत असावे.

3) किमान 12 वी उत्तीर्ण असावा.

1)अर्ज दाखल करावा

2) प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा राहील.व दरमहा सहा हजार विद्यावेतन मिळेल .

3) आवश्यक कागदपत्राांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा (screening test) घेण्यात येईल. त्याआधारे उमेदवारांची गुणानुक्रमे निवड करण्यात येईल.

4) प्रशिक्षण एप्रिल 2023 पासून सुरू होईल.

5) दरमहा 75 टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये 6000/- विद्यावेतन (Stipend) मिळेल. प्रशिक्षण 6 महिने रोज 4 तास असेल"

6) विद्यार्थ्यांना रु. 5000/- एवढ्या शुल्काचे अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी मार्फत देण्यात येईल

अधिक माहितीसाठी :

सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी 

शिर्के प्लाझा बिल्डिंग 2रा मजला तहसीलदार कार्यालयासमोर सकाळ ऑफिसच्यावर जयस्तंभ रत्नागिरी 

संपर्क मोबाईल 7875696845 /8149109572

(उमेदवारांनी प्रत्यक्ष कागदपत्रांसहित सेवा सामाजिक विकास संस्था रत्नागिरी या केंद्रावर भेट देऊन अर्ज दाखल करावे.)