औरंगाबाद:- (दीपक परेराव)समाजाचे आपण काही देणं लागतो या उदात्तेतूने कार्य करणारी संघटना म्हणजे श्रीमानयोगी छत्रपती सेना. श्रीमानयोगी छत्रपती सेना संघटना जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम घेऊन समाजातील विविध घटकातील मदत करत असतात.या वर्षी या संघटने तर्फे दिपावली निमित्त जिल्हा रुग्णालय,कॅन्सरग्रस्त रुग्ण तसेच शिबिरा मधील रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया फ्रि केली व त्यांना एक साडी देण्यात आली. तसेच घाटी रुग्णालय परिसरतील निराधार व गोरगरीब रुग्णांची दिवाळी गोड करण्यासाठी फराळ व महिलांना साडी व लहान मुलांना कपडे असा छोटासा उपक्रम संस्थेमार्फत घेण्यात आला.
यावेळी श्रीमानयोगी छत्रपती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अनिल औताडे, प्रभुदेवा सपकाळ, राम औताडे, कृष्णा दौड, योगेश हरणकाल, महेश दापके, प्रकाश पठाडे, कैलास खैरनार, कृष्णा गावंडे, संतोष रोटे, सचिन शिंदे, समाधान पंडित, गजानन सोनवणे, विजय खर्गे, अभय गडामोडे,गोकुळ इंगळे, नागेश पाचलोरे ई.. उपस्थित होते.