मालेगावं तालुक्यामध्ये बाल संस्कार शिबीर ,महिला प्रशिक्षण शिबीर चे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष अनिल तायडे यांनी दिली. सिद्धार्थ भगत सर यांच्या सहकार्याने भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शाखे अंतर्गत मालेगाव तालुक्यातील 6 गावांमध्ये धम्म महीला प्रशिक्षण शिबिर व 7 गावांमध्ये बालसंस्कार शिबिर यांची तारीख निश्चित झाली असून आद. केंद्रीय शिक्षिका यांची धम्म प्रशिक्षण शिबिर पत्रिका केंद्रीय शाखा मुंबई यांच्या द्वारे आदरणीय माउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या कार्य आदेशान्वे जाहीर झाली आहे.आणी लवकरच मालेगावं तालुक्यातील जउळका, खेर्डी, पांगराबंदी,वाघी,हनवतखेडा,डहीया ठिकाणी धम्म महिला प्रशिक्षण शिबीर घेतले जाणार आहे. केंद्रीय शिक्षिका स्वातीताई गायकवाड मुंबई, प्रमिलाताई डांगे अमरावती, लताताई लोणारेअकोला, संध्याताई पंडित रिसोड, मंदाताई गवई,यांची मालेगाव तालुका महिला प्रशिक्षणाकरिता निवड झाली आहे.अशी माहिती अनिल भिमराव तायडे,मालेगाव तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी दिली.