वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगर परिषद सर्वपरिचित असून या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणी प्रशासन यांच्यामध्ये ताळमेळ दिसून येत नसल्याने विकास कामाना खो बसत आहे.
नियोजन शून्य कारभारामुळे येथील नागरिकांना,समाजिक कार्यकर्ते,माजी नगरसेवकांना नगर परिषदेची पायपीट करित असताना मात्र मुख्याधिकारी हजर नसतात त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोआहे.त्यामुळे येथील माजी नगरसेवक अनिल गावंडे यांनी अभिनव शक्कल लढवत मुख्याधिकारी दाखवा व दहा हजार रुपये बक्षीस मिळवा असे बक्षीस ठेवत आतातरी मुख्याधिकारी यांनी हजर राहत जनतेची कामे करावी.अशी मागणी केली आहे.