बीड (प्रतिनिधी) आज दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त धनगर समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यशवंतराव होळकर यांना अभिवादन करण्यात आले यशवंतराव होळकर यांच्या विषयी बोलताना प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटन महाराष्ट्र राज्य यांनी संबोधित करताना सांगितले की,
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
28 ऑक्टोंबर १८११ हिंदुस्थानात आपल्या कबायती फौजांचा ठेंबा मिरविणाऱ्या इंग्रजांचा नक्षा फक्त वीर श्रेष्ठ यशवंतरावांनी उतरलेला होता. अखेर पर्यंत इंग्रजांची तैनानी फौज न स्वीकारणारा फक्त चक्रवती यशवंतराव होळकर हाच इंग्रजांचा शत्रू होता. महाराज यशवंतराव यांच्या विषयी इतिहासकार गो.स. सरदेसाईच्या मते मराठासाहीच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या पडत्या काळात चक्रवती यशवंतराव होळकर हा एक फार मोठा हिरा अल्पकाळात चमकून गेला. या हिऱ्याने आपल्या तेजाने त्या काळातील निबीड आधार किंचित काळ दूर सारला. त्याच वेळी त्यांच्या तोडीचा सेनानाईक मराठ्यांकडे दुसरा कोणी नव्हता .अंतकरणाचा उदार गरिबांचा कनवाळू हाताखालच्या मंडळीस जीवा पलीकडे जपणारा स्वतःच्या सुखा विषयी अत्यंत निरीच्छ पण समरांगणी कर्दनकाळ असे यशवंतराव होळकरसारखे पुरुष आपणास आपल्या इतिहासात क्वचितच दाखविता येतील. वीरश्रेष्ठ यशवंतराव यांचे सर्व चरित्र इतके अध्दुत व हृदयसंगम आहे. की ते सर्व व्यवस्थित व साधार लिहिले जाईल. जॉन मल्लकमने यशवंतरावाची बदनामी करण्याची एक संधी सोडली नाही. परंतु असे असले तरी हिंदुस्थान इंग्रजाविरुद्ध उभार करणारा तो एक बाणेदार मराठा सरदार होता. वीरश्रेष्ठ यशवंतराव होळकर इंग्रजांविषयी माल्कम लिहितो की, परकीयांनी तुमच्या आमच्या समोर एक दौलत घशात टाकली त्यांना कुठेतरी जबरदस्त तडाका दिला नाही तर उद्या तुम्हाला सारा दक्षिण मावळा व हिंदुस्थान यांनी घेतलेला दिसेल. त्यास पाय बंद घालावा हा आमचा उद्देश परंतु वीर श्रेष्ठ यशवंतराव होळकरांसारख्या पराक्रमी मराठा सरदाराला पेशवे दौलतराव शिंदे भोसले इत्यादींनी साथ न दिल्यामुळे शेवटी केवळ दौलतीच्या हिंदुस्तान विचारतच महाराज यशवंतराव होळकरांचे निधन झाले ती तारीख होती २८ऑक्टोबर १८११ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अशा प्रकारे होळकर शाहींचा इतिहास आपण सर्वांनी जागृत केला पाहिजे. यावेळी सर्व समाज बांधव आदींच्या उपस्थितीमध्ये हा अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.