तळेगाव ढमढेरेतील माजी विद्यार्थी २६ वर्षांनी आले एकत्र
-दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा उत्साहात
आकाश भोरडे
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील सन 1996 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
तळेगाव ढमढेरे(ता.शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील मार्च 1996 मध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा 'स्नेहबंधन 1996' आरोह सृष्टी कृषी पर्यटन केंद्र,धानोरे येथे गुरूवार (दि.२७) रोजी उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला. या स्नेहबंध मेळाव्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महादेव भुजबळ याच्या स्वागत गीताने झाली.त्यानंतर स्वतःचा अल्प परिचय, मनोगत, शालेय जीवनातील गोड आठवणी आदी विषयांवर प्रत्येक जण व्यक्त झाला.तब्बल 26 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांना एकमेकांची ओळख करून घेताना, एकमेकांच्या खुशाली विचारताना तसेच चेष्टा मस्करी करताना चेहरे अगदी प्रफुल्लित झाले होते. मनोगतानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकत्रितरीत्या केक कापण्यात आला तसेच यावेळी एका मित्रास सायकलही सप्रेम भेट देण्यात आली.
यावेळी नंदकुमार केंजळे, प्रकाश ढमढेरे, डॉ.चंद्रकांत केदारी,अविनाश कुंभार, दत्तात्रय नरके, राजकर्ण तोडकर, राजेंद्र ढमढेरे, तानाजी वाघोले, विकास फुलावरे,मंदार पवार,नागनाथ झुरूंगे, संजय जेधे,वर्षा जाधव,माऊली थेऊरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश गायकवाड यांनी केले. शैलेंद्र शेवकर व किशोर नरके यांनी सूत्रसंचालन केले तर जयश्री भुजबळ यांनी आभार मानले.