रत्नागिरी: कोकणात अनेक चांगल्या प्रतीचे खेळाडू तयार होत असतात. पण आर्थिकदृष्टया मागासलेल्या क्रीडापटूंचे करिअर आर्थिक पाठबळामुळे थांबते. अशा क्रीडापटूंना मदत व्हावी म्हणून अनुजा तेंडोलकर यांनी चित्र प्रदर्शन भरवले आहे. व्यंकटेश हॉटेल मारूती मंदिर रत्नागिरी येथे दि.28 ते 30 ऑक्टोबर यादरम्यान हे प्रदर्शन असणार आहे. 

            

कोकणात कितीतरी खेळाडू असे आहेत त्यांना क्रीडा साहित्य घ्यायलाही पैशाची उणीव भासते. अनेकदा सकस आहार घेण्यासाठी देखील चणचण भासते. अशा खेळाडूंना मदत व्हावी या हेतूने अनुजा तेंडोलकर यांनी मागील काही कालावधीपासून चळवळ सुरू केली आहे. अनुजा तेंडोलकर स्वत: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू असल्याने त्यांना क्रीडापटूंच्या अडचणी अवगत आहेत. म्हणून त्यांनी स्वत: तयार केलेल्या पेंटीगच्या विक्रीतून त्या खेळाडूंना आर्थिक मदत करत असतात. त्याच हेतूने त्यांनी व्यंकटेश हॉटेल मारूती मंदिर रत्नागिरी येथे दि.28 ते 30 ऑक्टोबर यादरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या कालावधीत चित्र प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. तसेच ‘पोलादी’ हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाला भेट देवून पेंटिंग्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून खेळाडूंना सहाय्य करावे असे आवाहन अनुजा तेंडोलकर यांनी केले आहे.