निमगाव म्हाळुंगी येथे क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

-अमरज्योत मित्र मंडळ ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

               निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे नुकतीच क्रिकेटची स्पर्धा पार पडली. तुकाई माता मित्र मंडळाच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

               निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघानी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये सर्व संघावर विजय प्राप्त करत अमरज्योत मित्र मंडळ (काळे वस्ती) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, गणराज क्रिकेट क्लब (माळीमळा) यांनी द्वितीय क्रमांक, जयभवानी क्रिकेट क्लब (गावठाण) यांनी तृतीय क्रमांक तर ओम साई क्रिकेट क्लब (गावठाण) हे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले. तुकाईमाता मित्र मंडळ (पवारवस्ती) यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.