अमोल भांबरकर

अहमदनगर

  नगर-

सायंकाळी आपण शुभंकरोती कल्याणम,आरोग्यम्, धनसंपदा ही प्रार्थना म्हणतो.या प्रार्थने प्रमाणे दीपावलीच्या बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्त सर्वांचे आरोग्य उत्तम राहू दे. सर्वांना धनसंपदा लाभू दे.अशी मागणी हिंदू धर्मात केली जाते. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी सांगितले प्रमाणे आयोध्या येथे शरयू नदीच्या ठिकाणी लाखो दिवे लावून विश्वविक्रम केला आहे. त्याचप्रमाणे आडते बाजार,डाळ मंडई येथे विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल,दुर्गा वाहिनी,मातृ शक्ती,सामाजिक समरसता,मठ मंदिर समितीच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.श्रीराम मंदिर निर्माण कार्य होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सह मंत्री मुकुल गंधे यांनी केले. आडते बाजार येथील श्रीराम मंदिरात दीपावली पाडव्यानिमित्त विश्व हिंदू परिषद,बजरंग दलातर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे सहमंत्री मुकुल गंधे,मठ मंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे,श्रीराम मंदिराचे विश्वस्त शेखर राणा,बजरंग दलाचे जिल्हा संयोजक भारत थोरात,अशोक जोशी(बन्सी महाराज मिठाई वाले),ओमकार साळवे,महेश बेद्रे,पप्पू मूळे,दिनेश क्षीरसागर,उमेश जोशी,प्रजवल सिद्ध,ओम भिंगारे,तुषार वाडेकर, सार्थक भागानगरे आदी उपस्थित होते. भारत थोरात म्हणाले, दीपावली हा सण सर्वत्र आनंदाने साजरा होत आहे.या दीपोत्सवामुळे प्रत्येकाच्या जीवनातील अंधकार दूर होवो.ही दीपावली सर्वांना सुखी समृद्धीची जावो हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना करतो. याप्रसंगी उपस्थित राम भक्तांचे उमेश जोशी यांनी आभार मानले. फोटोकॅप्शन-आडते बाजार येथील श्रीराम मंदिरात विश्व हिंदू परिषदेतर्फे पाडव्या निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आले.

 (छाया -अमोल भांबरकर)

संपादक - सुरेश तायडे