चिपळूण :बाळासाहेबांची शिवसेनेच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभाक्षेत्र प्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक उद्योजक अनंतराव पवार यांची तर चिपळूण तालुकाप्रमुखपदी आक्रमक आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे संदेश उर्फ बापू आयरे यांची तर तालुका समनव्यपदी दिलीपराव चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी सुप्रिया सुर्वे यांची निवड आज जाहीर करण्यात आली असून बहादूरशेख येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्या नंतर चिपळूणमध्ये ही दोन गट निर्माण झाले चिपळूणमध्ये शिवसेना उभी करणारे माजी आ. सदानंद चव्हाण यांनी आपल्या हजारो शिवसैनिकासह बाळासाहेबांची शिवसेनेचा मार्ग स्वीकारला आहे आणि चिपळूणमध्ये हजारो कार्यकर्त्यासंमवेत संघटना बांधणी ही सुरू केली असून या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र सचिव संजय मोरे यांनी आज जाहीर केल्या आहेत.

चिपळूण शिवसेनेच्या जडणघडणीत ज्याचे मोठे योगदान आहे असे उद्योजक जेष्ठ शिवसैनिक अनंतराव पवार यांची चिपळूण संगमेश्वर विधानसभाक्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चिपळूणसह संगमेश्वर तालुक्यात अनंतराव पवार यांना मानणारा शिवसैनिकांचा मोठा वर्ग आहे. चिपळूण तालुका प्रमुखपदी आक्रमक आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे संदेश उर्फ बापू आयरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे युवा तालुकाधिकारी म्हणून त्यानी तालुक्यात काम केले असून युवा सेनेचा झंझावात श्री आयरे यांनी तालुक्यात निर्माण करून हजारो युवा सैनिकांची फौज त्यानी तयार केली होती त्यांची निवड संघटनेला नवी ऊर्जा देणारी ठरणार आहे.

    

जेष्ठ शिवसैनिक आणि तालुक्यात शिवसैनिकाच्या सुखदुःखात धावून जाणारे शिवसेना उभी करताना वाडीवस्तीवर जाऊन शिवसैनिकांची मोठं बांधणारे दिलीपराव चव्हाण यांची तालुका समनव्यक म्हणून निवड झाली आहे महिला आघाडी तालुका महिला संघटकपदी सुप्रिया सुर्वे यांची निवड आज जाहीर झाली आहे 

   

 बाळासाहेबांची शिवसेना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज जाहीर होताच माजी आ सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर आज सकाळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून निवडीचे स्वागत करण्यात आले माजी आ सदानंद चव्हाण माजी उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.