पाटोदा (प्रतिनिधी) लष्करातून निवृत्त होऊन गावी परतलेल्या बहुतांश सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.मात्र पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथे वेगळेच काही पाहिला मिळाले सेवा निवृत्त होऊन हवालदार प्रकाश कुडके फौजी गावी परतल्यानंतर पाचंग्री गावकर्यानी हार फेटा घालून व फटाक्याच्या आतष बाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यानंतर गावातून प्रकाश कुडके फौजी यांची दिमाखदार भव्य दिव्य जंगी मिरवणूक काढण्यात आली.सैनिक जवान कुडके यांना हा अनोखा अनुभव आला असून प्रकाश कुडके लष्करातील सेवा पूर्ण करून ते गावात परतले असल्यामुळे गावाच्या या सुपुत्राचे ग्रामस्थच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गावापासून दूर राहून लष्करात 20 वर्षे देशसेवा केलेल्या हवालदार प्रकाश कुडके यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली तर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने कुडके हेही भारावून गेले.'मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्‍वासापर्यंत सुरूच राहील,'अशी प्रतिक्रिया प्रकाश कुडके यांनी आपल्या सत्कार पर भाषणात व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प बोधले महाराज तर प्रमुख उपस्थिती सरपंच सुप्रिया संतोष कोल्हे,युवानेते गणेश कोल्हे,मंञालय सचिव राणी कुडके, यांच्यासह मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते