रत्नागिरी : तालुक्यातील दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान क्रीडा,सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक या संस्थेच्या वतीने संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार श्री. कौस्तुभ बुटाला यांच्या सहकार्याने खेड येथील गरजू दिव्यांग सुमित बावधनकर याला दिवाळी निमित्त खास भेट देण्यात आली.
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यात विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून आपल्या दिव्यांग बांधवाला दिवाळीची खास भेट द्यावी या संकल्पनेतून प्रतिष्ठानचे पदाधिकारी पुढे सरसावले. अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.प्रशांत सावंत यांच्या हस्ते दिव्यांग सुमित बावधनकर याला जॉगिंग वोकर साहित्य देण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधीकारी रेणुका गोरीवले,पांडुरंग नाचरे,हर्षद चव्हाण,प्रज्ञा जंगम,राजेश धारिया,सागर जाधव आधी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग युवा क्रिडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने गरजू दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आणि अनोख्या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातुन प्रतिष्ठानचे कौतुक केले जात आहे.