चिपळूण : लहान मुले फटाके वाजवित असताना फटाक्याची ठिणगी घराच्या छप्परावर उडाल्याने त्यावरील प्लास्टिक जळाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. घरमालकाने प्रसंगावधान राखत चिपळूण नगर पालिकेचा अनीशमन बंब पोहोचण्यापूर्वीच बोअरवेलच्या पाण्याने ती आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, भर वस्तीत ही घटना घडल्याने नागरिकही भयभीत झाले होते.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

शहरातील खंड- भाटीया गॅरेज परिसरातील एका गल्लीमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला. काही मुले फटाके वाजवित होती. याचवेळी त्यातील एका पेटलेल्या फटाक्याची ठिगणी शेजारी असलेल्या बाबू महाजन यांच्या घरावर उडाली. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी श्री. महाजन यांनी आपल्या घरावर प्लास्टिक कापड पांघरले होते. फटाक्याची ठिगणी त्या प्लास्टिक कापडावर पडल्याने पेट घेतला. हळुहळू ती आग वाढू लागली. त्यामुळे आग विझविण्यासाठी स्थानिक मालक श्री. महाजन आणि नागरिकांची धावाधाव उडाली. त्याचवेळी नगर पालिकेच्या अग्नीशमन विभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, श्री. महाजन यांनी तातडीने आपल्या घर परिसरात असलेल्या बोअरवेलच्या पाण्याने ती आग विझविली. तेवढ्यात नगर पालिकेचाही बंब तिथे पोहोचला. मात्र त्यापूर्वीच ती आग विझवण्यात आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. जिथे ही घटना घडली तो परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे नागरिकही भयभीत झाले होते. 

• फटाके वाजविताना खबरदारी घ्या

दिवाळीत फटाके वाजविणे हा लहान मुलांचा छंदच असतो. मात्र या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना राज्यातील अनेक ठिकाणी घडत आहेत. याशिवाय फटाके फोडत असताना लहान मुले जखमी होण्याचेही प्रसंग समोर येत आहेत. सध्या भातशेती कापणीयोग्य झाली आहे. शहरातील लोकवस्तीचा विचार करून लहान मुलांनी हे फटाके वाजविताना काळजी घेणे गरजेचे आहे.