घराला आग लागून घरातील संसारपयोगी साहित्य खाक

"पैठण तालुक्यातिल मुरमा येथील घटना"

पाचोड(विजय चिडे)  पैठण तालुक्यातिल मुरमा येथील एका घरास आग लागून घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना (दि.२६) रोजी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देत होते.

मुरमा येथील नाथा पोटफोडे याची घरची परिस्थितीत अत्यंत हालकीची आहे.ते शेत मजूरी करून पत्नी,दोन मुले सह त्यांच्या कुंटूबाचा संसाराचा गाडा हाकलत होते.ते या पत्राच्या घरात पत्नी व मुलांसोबत राहत होते. बुधवारी सकाळी घरातील सर्व जण कामानिम्मित बाहेर गेले होते.

परंतु, त्यांच्या घराला अचानक आग लागली ही आग नेमके कशामुळे लागली हे अद्यापही अपष्ट आहे.या आगीमध्ये घरातील धान्य व संसारपयोगी सर्व साहित्य सह एक दुचाकीही जळुन खाक झाले आहे.पत्नी व लहान मुलाबाळांना दिवाळीसणा निम्मित नाथा पोटफोडे यांनी नुकतेच नवीन कपडे घेऊन ठेवले होते. परंतु आगीत कपडे व पैसेही जळून गेले. सुदैवाने मात्र घरातील गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही,त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे पोटफोडे यांनी सांगितले आहे. या घटने पाचोड पोलिसांना भेटली असता बीट जमादार किशोर शिंदे,पोलिस नाईक फिरोज बर्डे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. पोटफोडे यांच्या घराला आग लागून संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची माहिती माजी सभापती विलास भुमरे यांना भेटली असता त्यांनी पोटफोडे यांच्या घरी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. तरी महसूल विभागाच्या तलाठ्यांना तात्काळ नुकसानग्रस्तास मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.