केज तालुक्यात मागिल महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतातील काढणीस आलेलं सोयाबीन व कांद्याचे पीक वाया गेल्यामुळे गणेश मारोती सारुक रा. जोला ता. केज जि.बीड वय 31वर्षे यांनी कर्जबाजारीपणा व नापिकी ला कंटाळून आत्महत्या केली आहे.
ऐन दिवाळीत आत्महत्या केल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सरकारी यंत्रणा गाढ झोपेत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे.पण विमा कंपन्या विविध कारणे सांगून पैसे द्यायचे टाळत आहेत. सरकारी पिक नुकसान भरपाई पण वेळेत मिळत नाही.यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सरकारी यंत्रणा गाढ झोपेत आहे. याच कारणामुळे गणेश मारोती सारुक यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. गणेश कडे सेवा सहकारी संस्थासह खाजगी सावकारांचे अंदाजे साडे तीन लाख रु कर्जामुळे स्वतः च्या शेतातील लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन जिवनयात्रा संपवली.
गणेश यांच्या कुटुंबात पत्नीसह, दोन मुली, एक मुलगा, वयोवृद्ध आजी असा परिवार आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.