संगमेश्वर : तालुक्यात एकाच रात्री तीन मंदिरे व एक घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सगंमेश्वर पोलिसांची झोप उडवली आहे. संगमेश्वर तालुक्यातील श्री वरदायनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून गाभाऱ्यात दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यानी सरंद गुरव वाडीतील वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडली. हे चोरटे माखजन धामापूर गुरववाडीतील श्री नवसरी ग्राम देवीच्या मंदिरात पोहचले आणि त्याठिकाणी देखील गाभाऱ्यातील दान पेटी फोडून रोख रक्कम लंपास केली.
संगमेश्वर तालुक्यातील 3 मंदिरातील दान पेट्यांवर डल्ला मारून चोरट्यांची पावले नावडी परिसराकडे वळली. नावडी येथील वैशाली संजय रहाटे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. एकाचवेळी ४ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने संगमेश्वर पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.