चिपळूण : राज्य सरकारने दिवाळीसाठी सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयामध्ये पामतेल, रवा, डाळ, साखर असे साहित्य असलेले कीट उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती; परंतु दिवाळी सुरू झाली तरी चिपळूण तालुक्यात काही स्वस्त धान्य दुकानात हे सरकारी दिवाळी कीट आणि इतर अन्नधान्यही उपलब्ध झालेले नाही. यामुळे १०० रुपयात दिवाळी किराणा साहित्य ही योजना फसवी आहे की काय, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.चिपळूण तालुक्याचा काही भाग दुर्गम असून आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. येथील सर्वसामान्य लोक दिवाळी सणाला सरकारी स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या धान्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. शासकीय अन्नधान्य वितरण गोदामात पामतेल आहे तर रवा नाही, साखर आहे तर डाळ नाही, अशी परिस्थिती असून एकाचवेळी १०० रुपयात सर्व किराणा साहित्य मिळत नसल्याने हा प्रकार म्हणजे शासन सर्वसामान्य जनतेची चेष्टा करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. १०० रुपयात येणारे दिवाळी किराणा कीट नाही; परंतु महिन्याला मिळणारे धान्यतरी वेळेत द्या, अशी मागणी परिसरातील लाभार्थ्यांकडून होत आहे.दिवाळी सण हा प्रकाशाचा उत्सव. या सणाच्या तयारीला सर्वजण आठवडाभर आगोदरच लागतात. मात्र, ऐन दिवाळीत स्वस्तात मिळणारे दिवाळी किराणा साहित्य मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सण साजरा करायचा कसा, असा खडा सवाल केला जात आहे. स्वस्त धान्य दुकानात दिवाळीचे किराणा साहित्य कीट आणि या महिन्याचे अन्नधान्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी १०० रुपयात दिवाळी किराणा साहित्य कीट देण्याची घोषणा केली खरी; परंतु त्याची अंमलबजावणी करणार कोण? दिवाळी सुरू झाली तरी प्रशासनाची कोणतीही तयारी नाही. अद्यापही शासकीय स्वस्त धान्य दुकानात दिवाळी किराणा साहित्य कीट उपलब्ध नाही. शासनाने सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळू नये, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

घोषणा देणारे सरकार

हे सरकार फक्त घोषणा देणारे सरकार असून सर्वसामान्य जनतेप्रती यांना काहीही कळवळा नाही. सरकार घोषणा करते; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात विलंब का? केलेल्या घोषणांचा युद्धपातळीवर निपटारा व्हावा व सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करावी. असे मत सामाजिक कार्यकर्ते शौकत मुकादम यांनी व्यक्त केले.