रत्नागिरी : मावळते पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दोन वर्षांच्या सेवेच्या काळात जिल्हा पोलीस दलाच्या उभारणीसाठी महत्वपुर्ण काम केले आहे. विविध उपक्रम राबविताना त्यांनी चांगली माणस उभी करण्याचे काम केले आहे. त्याचे उत्तर आजचा निरोप समारंभ आहे. त्यांनी सुरु केलेले चांगले उपक्रम मी सुरुच राहतील. प्रशासकीय सेवेत काम करताना सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवूण काम करणे आवश्यक आहे. यापुढील काळात सर्वांनी आपण सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहोत हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करावे अशी सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते.

डॉ. गर्ग यांच्या निरोप समारंभाला माजी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, प्रभारी जिल्हा पोलीस उपअधीक्षक (गृह) मारुती जगताप, उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरिक्षक विनित चौधरी, हेमंत कुमार शहा यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. गर्ग यांचा पोलीस दालाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तर नूतन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे जिल्ह्याच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. गर्ग यांनी आपल्या मनोगतात जिल्हावासियांचे आभार मानले. पोलीस अधीक्षक म्हणून पहिलीच नियुक्ती होती. अधीक्षक म्हणूण नेमके काय करायचे याची माहिती नव्हती. येथे आल्यानंतर सोबतच्या कर्मचाऱ्यांसह कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी बरीच माहिती मला दिली. त्या माहितीद्वारे काम करताना खूप फायदा झाला. विविध उपक्रम राबविताना काहि अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे विविध उपक्रम पुर्ण होऊ शकले. तर काही पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर आपला भर होता. काही प्रमाणात त्याला यश आले आहे. दोन वर्षात नियमात राहून काम करताना पोलीस दलातील सहकाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांचे मोठे सहकार्य मिळाल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले. त्यांनतर फुलांनी सजवलेल्या गाडी गर्ग कुटुंबियांना बसवून पुष्पवृष्टी करत पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. गर्ग यांना निरोप दिला.