संगमेश्वर : चिपळूण - संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना प्रत्यक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

१९९० साली आमदार झाल्यानंतर रवींद्र माने यांनी हि प्रथा सुरु केली होती त्यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ति जोपासली त्यानंतर आमदार झालेले सुभाष बने, सदानंद चव्हाण यांनीही हि प्रथा जोपासली. 

याच प्रमाणे आ. शेखर निकम यांनीही आज हि प्रथा जोपासली. विशेष म्हणजे आजच्या या शुभेच्छा फेरीत राष्ट्रवादीसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.