दहा वर्षाच्या मुलीने बनविला पद्मदुर्ग .
वाघोली (ता. हवेली)येथील जगताप वस्ती सद्गुरु पार्क येथे राहणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीने समुद्रातील पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनविली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्मदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली.या किल्ल्याच्या चोही बाजूने निळसर समुद्र आहे. या किल्ल्यावर अकरा बुरुज आहेत. आणि या किल्ल्याला एक महादरवाजा व दुसरा दर्यादरवाजा बनविला आहे. किल्याच्या समोर V(व्ही)आकाराची मोठी संरक्षण भिंत या किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये दिसत आहे. जान्हवी हीने आपल्या भावांच्या मार्गदर्शनाने या जलदुर्ग किल्ल्याची माहिती मिळवत पाण्यामध्ये प्रतिकृती साकारली असून आसपासचे नागरिक,शेजारी वस्तीतील लहान मुले हा किल्ला पाहण्यासाठी आवर्जून येत असुन.जान्हवीचे कौतुक करीत आहेत.