कन्नड : मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची एकीकडे चर्चा सुरु असतानाच , दुसरीकडे त्याचवेळी एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली . पंडित एकनाथ निकम ( वय 47 ) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे . सतत पडत असलेल्या पावसाने पिके मातीमोल झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पंडित यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलेउद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून काल दिवसभर राजकीय नेत्यांकडून आरोप - प्रत्यारोप सुरु होते . याचवेळी कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील पंडित निकम या शेतकऱ्याने आत्महत्या केली . पंडित निकम यांची नादरपूर शिवारात गट नंबर 121 मध्ये शेती आहे . शेतात उधारीवर बियाणे आणून मका आणि कापूस पिकाची लागवड केली होती . जून - जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने पिके जोमात होती . कापसाला चांगला भाव मिळेल व कर्ज आणि उधारी फिटेल या आशेवर पंडित निकम यांनी जोमाने पिकांची मशागत व मेहनत केली . मात्र शेवटी परतीच्या अतिपावसाने पिकांना मोठा फटका बसला . कापूस पाण्याखाली तर मकाला कोंब फुटलेराज्यातील शेतकरी आज संकटात सापडला असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून फक्त दौऱ्यावर दौरे केले जात आहे . कृषीमंत्री यांनी आत्तापर्यंत 70 तालुक्यातील गावातील पाहणी केली आहे . मात्र असे असताना देखील शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाईची मदत मिळालेली नाही . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे .

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं