रत्नागिरी : तालुक्यातील पाली बाजारपेठेत शनिवारी रात्रिच्या दरम्यान कुत्री व शेळ्या यांच्या मागावर असलेल्या बिबटयाने काही कुत्र्यांवर हल्ला केला व त्याच दरम्यान माणसांची चाहूल लागल्याने त्याने झेप घेत पाली पोस्टऑफीस नजीक मुंबई गोवा रस्ता ओलांडून व तो पलीकडील जंगलमय भागात गेला. काही दिवसात त्याच परिसरातील चार ते पाच कुत्रे बिबट्याने मारल्याने आता बिबट्या सवयीने नागरी वस्तीत सातत्याने वावरत असल्याने सर्वत्र घबराट पसरलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पाली बाजारपेठेत शनिवारी रात्रिच्या दरम्यान कुत्री व शेळ्या यांच्या मागावर असलेल्या बिबटयाने काही कुत्र्यांवर हल्ला केला दरम्यान पोस्टऑफीस नजीक मुंबई गोवा रस्ता अचानक झेप घेत ओलांडला व तो पलीकडील जंगलमय भागात गेला. तसेच मागील आठवड्यात याच परिसरातील चार ते पाच कुत्रे त्याने मारलेली आहेत. बिबट्या पाली बाजारपेठेतील मुख्य नागरी वस्तीत रात्रीच्या वेळीस सातत्याने येत आहे. हा बिबट्याचा वावर होत असलेला परिसर मुख्य नागरी वस्तीचा भाग असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वळके बांबर या गावांचा जंगलमय परिसर असून येथे मागील काही वर्षामध्ये मोठी जंगलतोड झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे सहजरीत्या येत आहेत त्यामुळे पाली बाजारपेठ सुतारवाडी या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.