औरंगाबाद : सत्तारांची लफडी माझ्याकडे आली , त्यांचा बंदोबस्त करू ; खैरेंचे उद्धव ठाकरेंचा दौरा केवळ 24 मिनिटांचाच या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या टीकेवर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे . आमदार फोडण्यासाठी तुम्ही खोके दिले . शेतकऱ्यांना एक पेटी तरी द्या असे म्हणत अब्दुल सत्तार यांची सर्व लफडी माहिती आहेत . राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे हाहाकार उडाला . शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले . दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सेतीचे अतोनात झालेल्या नुकसानीमुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना भरीव मदत करावी , अशी मागणी केली जात आहे . याच धर्तीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले . त्यांचा ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे . ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा आहे , असे ते म्हणाले . यावर चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर दिलेचंद्रकांत खैरेंनी टीका केली की , शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे काम हे सत्ताधाऱ्यांचे आहे . त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरावे . तुम्ही 50 खोके आमदारांना देता . मग शेतकऱ्यांना एखादी पेटीतरी द्या . शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही . सगळे आपापल्या धुंदीत आहेत . याच कारणामुळे उद्धव ठाकरे बाहेर पडले आहेत . खैरे म्हणाले , मी गेलो म्हणून ते निवडून आले . पण आता त्यांना मस्ती आली आहे . ते सगळीकडे फिरत असतात . कधी इकडे , कधी तिकडे . आता आजून कोणत्या पक्षात जातील सांगता येत नाही . त्यामुळे त्यांनी थोडं थांबावं . आम्ही त्यांचा बंदोबस्त करू . त्यांची अनेक लफडी माझ्याकडे आली आहेत . अब्दुल सत्तारसारखा माणूस उद्धव ठाकरेंवर टीका करतो . त्यांना हे कळत नाही , की आपण उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले आहे