गोपाल तायडे
बुलढाणा
ओला दुष्काळ जाहीर करून सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रु.नुकसान भरपाई द्या. हि मागणी करत दिवाळीच्या दिवशी सकाळी पहाटेपासून अर्धनग्न अवस्थेत जहरच्या बाटल्या हातात घेऊन विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर सह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत...
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येला शिंदे-फडवणीसांचे सरकारच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारवर केला आहे..
पिकांचे नुकसान होऊनही सरकारने अतिवृष्टीची मदत दिली नसल्याने संतप्त शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत..
सरकारने पंचनाम्याचे थोंटाग पुढे करून खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना मदतीपासून वंचीत ठेवत. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय.केल्याने शेतकऱ्यांवर जहर खाण्याची वेळ आली असल्याच्या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया..
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्यांना विना अट १००% पिक विमा द्या, अशी मागणी यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारकडे केली आहे..
यावेळी जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष सय्यद बाहोद्दीन, विलास इंगळे, तेजराव लोणे, अकरम दौला, अंकित दाभाडे, विजय ठाकरे, रामेश्वर घाटे, अनंता राजनकार,सुरेश तोठे, धनंजय कोरडे, गोपाल वायझोडे, मोहन गावंडे,विजय मानकर,शरद देवळे, नयन इंगळे, सुपडा सोनोने, समाधान धुर्डे, सदानंद माजरे, शैलेश वाघ, मनोहर उमाळे, सुनिल इंगळे, सुनिल जाधव, राजू देशमुख, अमोल सोनोने, शिवदास वाघ,श्याम वाघ, सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..
संपादक - सुरेश तायडे