बीड प्रतिनिधी- नवीन पोलीस लाईन जुना चाराठा रोड ऐन दिवाळीच्या तोंडावर अंधारात आहे याकडे ना नगरपरिषद लक्ष देत आहे .ना विद्युत विभाग यामुळे येथील नागरिकांना रस्त्यावरून रहदारी करताना खूप त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या काही महिन्यापूर्वीपासून या ठिकाणचे स्टेट लाईट बंद आहेत त्यामुळे रात्री आणि पहाटे रस्त्यावरून प्रवास करताना अदाचारी आणि वाहनधारकांना त्रास होतो.

एकूणच परिस्थिती पाहिली असता पहाटेची वेळी घरातील स्त्रिया पुरुष वृद्ध फिरायला जातात कुत्र्यांचे टोळके येतात अंधारात त्यांना दिसत नाही आणि त्याचा देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे असा त्रास होत असल्याने येथील नागरिकात मनस्ताप निर्माण झाला आहे एकूणच या भागात आता नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे असताना देखील नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत या भागातील दिवे स्टेट लाईट तात्काळ दुरुस्त करून लावाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे जर या पोलीस लाईन जुना चार्ट रोडला तात्काळ लाईट चालू केल्या नाहीत तर नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे