दापोली : शिवसेना नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागाने जाहिरात दिलीय. हे रिसॉर्ट पाडण्याचा कालावधीदेखील निश्चित करण्यात आला आहे.

        

अनिल परब यांचं दापोली येथे साई रिसॉर्ट आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टसंबंधी आक्षेप घेतले होते. पर्यावरणीय नियमांचा भंग केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला. 

संबंधित विभागाने या रिसॉर्टची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते अनधिकृत ठरवलं आहे. आज चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात देत रिसॉर्ट पाडण्याचा कालावधी तीन महिने ठेवण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. या पाडकामाचं टेंडर बांधकाम विभागाकडून काढण्यात आलं आहे.

यामध्ये इमारतीची भिंत, कंपाऊंड वॉल, पोचरस्ता, एनएक्सचे बांधकाम पाडायचे आहे. शिवाय जागेचंही सपाटीकरण करायचं आहे. याच कामाची माहिती या जाहिरातीमधून देण्यात आलेली आहे. कामाची अंदाजित रक्कम ४३ लाख २९ हजार ८ रुपये ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे रिसॉर्ट पडणार, हे निश्चित झालं आहे.