साथ फाउंडेशन तांदूळजा या संस्थेच्या वतीने यावर्षीची दिवाळी अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी कुटुंब आत्महत्या शेतकरी कुटुंब व सैनिक कुटुंब तसेच दिव्यांग कुटुंबासोबत साजरी करण्यात आली.त्याचाच एक भाग म्हणून आज सेवासदन मुलांचे वस्तीग्रह येथे ही आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी या कुटुंबातील महिला भगिनींना साडीचोळी तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. सात फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज कदम आणि मीराताई कदम हे मागील दहा वर्षापासून असा उपक्रम राबवत आहेत.ज्या घरामध्ये दिवाळी साजरी होत नाही त्या घरामध्ये दिवाळीनिमित्त आनंद देण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न सुरू असतो.तसेच कदम सेवासदन नावाचे वसतिगृह व मागच्या तीन वर्षापासून चालवत आहेत.. ज्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, ऊसतोड कामगारांची मुले तसेच निराधार मुली अशी 55 मुले आहेत. व ते विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहेत.हे सर्व कार्य करत असतानाच यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके गेली , काही शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या ,काही कुटुंबात दिव्यांग बांधव आहेत, काही कुटुंबातील मुले देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावत आहेत अशा सर्वांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करण्याचा मानस कदम दांपत्यांचा होता.या उपक्रमासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी साथ फाउंडेशनला मदत केली . त्यांचे सुद्धा सर्वांचे आभार मीरा कदम व धनराज कदम यांनी व्यक्त केले आहेत.22 ऑक्टोबर रोजी सेवासदन वसतिगृहात या सर्व कुटुंबात दिवाळी साजरी करण्यात आली. त्यावेळी आपल्याला माहेरात आल्यासारखे वाटत आहे अशा सर्व भगिनींनी भावना व्यक्त केल्या.या सर्व बहिणी सोबत दिवाळी साजरी करताना मला खूप समाधान वाटते आम्ही खूप नशीबवान आहोत की ,अशी दिवाळी आम्ही साजरी करू शकतो.. असे मत धनराज कदम यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी किशोर तळेकर, सृष्टी कयाल, डॉ. कंदी कैलास साबू, प्रफुल्ल बोराळकर, डॉक्टर मनोज साबू, प्रवीण महाजन, प्रभू आप्पा जिरवणकर, गोपाल भाऊ सोमानी, भास्करराव मोरे, कैलास साबू, जितू जैन, जीवन काबरा, ज्योती वाघमारे , लोकमत सखी मंच, चिंचोलीकर सर,वाघमारे सर, राजश्री क्षीरसागर, आदींनी परिश्रम घेतले.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, डॉक्टर मनसा कलासागर, डी वाय एस पी वाखारे सर, एपीआय गोपिनवाड सर, एपीआय घेवारे सर, शिवाजी कऱ्हाळे वाघमारे सर ,धनराज कदम, मीरा कदम, सेवासदनमधील मुले तसेच विविध कुटुंबातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.