पाथरी(प्रतिनीधी):-पाथरी,सोनपेठ मानवत तालुक्यातील ऊस उत्पादक,कामगार, कर्मचारी,व्यापारी, यांच्या साठी वरदान ठरलेल्या लक्ष्मीनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सच्या २१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर आज शनिवार २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर अग्निहोत्री यज्ञेश्वर रंगनाथ महाराज सेलूकर यांच्या मार्गदर्शनात अतुल गुरूजी खांडवीकर यांनी मंत्रोच्चार करत अग्निप्रज्वलीत केला.हा अग्नि यज्ञकुडात टाकत आहुती नंतर योगेश्वरीचा बॉयलर माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर टी देशमुख जीजा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुंदाताई आर देशमुख या दाम्पत्याच्या शुभहस्ते अग्निप्रदीपन करुन हा सोहळा संपन्न झाला.
सकाळी साडे नउ वाजता बॉयलर पुजन सोहळ्या साठी च्या पुजेला चेअरमन आर टी देशमुख जीजा आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सौ कुंदाताई आर देशमुख,संचालक अभियंते राहुल आर देशमुख,सौ प्रियंका राहुल देशमुख,डॉ अभिजित देशमुख,कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांच्या हस्ते विधिवत पुजना नंतर होमहवन केल्या नंतर २१ व्या गळिता साठी या वर्षी नव्याने तयार करण्यात आलेल्या बॉयलरचे पुजन करून मान्यवरांनी बॉयलर चे प्रदिपण केले हा सोहळा तब्बल अडीच तास चालला.
गत वर्षी मोठ्या संकटां वर मात करत हा साखर कारखाना सर्वात शेवटी २ जुन रोजी पर्यंत चालऊन संपुर्ण शेतक-यांच्या ऊसाचे गाळप करण्यात आले होते. संपुर्ण हंगामात अनेकवेळा बॉयलरच्या ट्यूब चे काम निघाले परंतु व्यवस्थापणाने धीर न सोडता वारंवार दुरुस्त्या करत हंगाम पुर्ण केला. या वर्षी या कारखाण्याची गाळप क्षमता एक हजार मेट्रीक टनाने वाढऊन नव्याने बॉयलर तयार करण्यात आला असून आता दर महा घेण्यात येणारी क्लिनिंग पण घेतली जाणार नसल्याचे कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी तेजन्यूजशी बोलतांना सांगितले. लवकरच इथेनॉल निर्मितीचे काम होईल,या साठी चे काम प्रगती पथावर असल्याचे ही ते म्हणाले. इथेनॉल निर्मिती प्रारंभाच्या कार्यक्रमा साठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणविस येणार असल्याचे ही अॅड रोहित आर देशमुख यांनी या वेळी बोलतांना सांगीतले.
येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष गव्हाण पुजन करून मोळी टाकण्याचा कार्यक्रम होईल या साठी चेअरमन आर टी देशमुख जीजा यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूनच पुढील नियोजन करणार असल्याचे अॅड देशमुख यांनी सांगून बॉयलर ची टेस्टींग किमान पाच दिवस घ्यावी लागेल त्या नंतरच प्रत्यक्ष गाळप पुर्ण क्षमतेने करण्यात येणार असल्याचे सांगुन कारखान्याचे संपुर्ण काम आटोपल्याचे सांगितले. या वर्षी कारखाण्याच्या वतीने बैलगाडी आणि मिनी ऊस वाहतुकीची यंत्रणा कारखाना साईटवर वाढवल्याचे ही त्यांनी या वेळी बोलतांना सांगितले.
बॉयलर प्रदिपण सोहळ्या साठी प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे,सुदामराव सपाटे,गंगाधरराव गायकवाड,भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव आंबट,पाथरी तालुकाध्यक्ष शिवराज नाईक,मानवत तालुकाध्यक्ष विश्वनाथ लाडाने,आरोग्य सेवक पप्पू नखाते,बबनदाजी सोळंके,कल्याण काळे, सरपंच विष्णू चव्हाण,नारायण राठोड,मंकाजी शिंदे,अशोक दुगाने,उत्तमराव आरबाड,भरत हारकाळ,माणिकराव आरबाड,अरुन आरबाड,संदिपानराव घुंबरे,पत्रकार किरण घुंबरे, कल्याणराव देशमुख,प्रकाश चांदगुडे,प्रमोद देशमुख,विलास आवरगंड,मुकेश रोडगे, राजकुमार तौर,वसंत चरमळ,मंदिप भंडारे,पांडूरंग जाधव,कल्याण फपाळ,माणिकराव डोंबे यांच्या सह कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक,तोडणी,वाहतुक ठेकेदार,कारखाण्यातील अधिकारी,कर्मचारी कामगार आणि नागरीक मोठ्या उपस्थित होते.