कन्नड तालुक्यातील वाकोद ते चिंचोली लिंबाजी रस्त्याची दुरवस्था तुंबलेल्या पाण्यात लोटांगण घेऊन प्रशासनाचा जाहीर निषेध वाकोद ते चिंचोली लिंबाजी रस्तांमध्ये पडलेल्या खड्यात तुंबलेल्या पाण्यात लोटांगण घेऊन प्रशासनाचे या रस्त्यांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी वंचित तर्फे लोटागणं घेण्यात आले... प्रशासनाला विनंती आहे की नवीन रस्तांचे काम केव्हा ही चालु करा. पण सध्यातरी सनासुदीच्या काळात या रस्तांची तात्पुरती का होईना डागडुजी करण्यात यावी. अशी मागणी वंचित तर्फे करण्यात आली... जर सणासुदीचा काळात वाकोद ते चिंचोली लिंबाजी रस्तांवर काही जिवित हाणी झाली तर पुर्ण पणे प्रशासन या घटनेला जबाबदार राहील...जर या रस्तांचे काम ताबडतोब चालु नाही तर येणाऱ्या काळात वंचित  तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा वंचित तर्फे देण्यात आला यावेळी उपस्थित वंचित कार्यकर्ते तातेराव भुजंग, भागवत चौतमोल, मनोज बावस्कर, अमृत चौघुले ,व ईतर कार्यकर्ते व वाटसरु उपस्थित होते