दापोली : कोकणातील एका विद्यापीठात अस्थाही कर्मचारी भरती प्रक्रिया हा विषय चर्चेत असताना आता याच विद्यापीठात बोगस आदिवासी दाखले जोडून नोकऱ्या लाटल्याचा आक्षेप बिरसा फायटर्स संघटनेने नोंदविला आहे. या ठिकाणी ३०० हून अधिक अस्थाही मजूर कर्मचारी आहेत. हे कर्मचारी पांढरे आणि तांबडे मस्टर यावर असून नियमानुसार त्यांना सेवेत समाविष्ट करून घेणे अपेक्षित आहे, असे हे मजूर सांगत आहेत. काही कर्मचारी रोजंदारी करून कायम न होता सेवानिवृत्त झाले आहेत, या मजुरांचा लढा हा आजही सुरू आहे. याबाबत विद्यापीठाने योग्य पाहणी का केली नाही? असा सवाल या संघटनेने उपस्थित केला आहे. बोगस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं