औंढा नागनाथ वसमत हा रोड बंद...
सततधार पावसामुळे चोंडी शहापूर या गावानजीक औंढा वसमत रोडवरील पावसाच्या पाण्यामुळे पुल तुटल्यामुळे हा राज्य रस्ता बंद करण्यात आलेला आहे .सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांच्यासह पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोहचले.औंढा वसमत रोडवरील वाहतूक सध्या ठप्प झाली असून वसमत वरुन परभणी मार्गे वाहतूक वळविण्यात आलेली असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून मिळते.पुल तुटल्याने रोडच्या दोन्ही साईड ला वाहनाच्या रागा लागल्या होत्या