औरंगाबाद : सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारूविक्रीचे मोठ्या प्रमाणात वाढले असून दारूड्यांचे महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत धानोरा वांजोळा येथील सरपंच अश्विनी काकडे यांना दारूबंदी बंद करण्यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील धानोरा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून येथील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दारूच्या व्यसनाकडे वळत आहे. तसेच गावामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडण तंटे होत आहेत. त्यामुळे गावात सुरू असलेली दारू ही तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.व लवकरात लवकर दारूबंदी न झाल्यास आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असेही निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे, यावेळी सरपंच अश्विनी काकडे उपसरपंच रमेश काकडे ग्रामसेवक आर बोडके पोलीस पाटील पंढरीनाथ काकडे स्वराज्य युवा संघटनेचे सिल्लोड तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भागवत काकडे, ग्रामपंचायत सदस्य नारायण काकडे, पोपट काकडे, भगवान बोराडे, गजानन बिडवे, भाजपचे राधाकृष्ण काकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं