यवतमाळ 21 ऑक्टोबर 2022

पंचायत समिती कार्यालय यवतमाळ जिल्ह्यामधील आरणी  येथे महाराष्ट्र राज्य कार्यरत कर्मचारी संघटना चे पदाधिकारी माननीय शेख जावेद राज्य अध्यक्ष, माननीय भारत भाऊ डोंगरे राज्य सरचिटणीस, गोपाल भाऊ राठोड राज्य उपाध्यक्ष, विनोद देशमुख राज्य कोषाध्यक्ष ,शरद डहाके राज्य संघटक ,वाशिम जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाचारणे, घनश्याम मारोटकर कारंजा तालुका सचिव ,भाऊराव जाधव मानोरा तालुका अध्यक्ष ,संतोष वानखडे मानोरा तालुका सचिव ,गोपाल चव्हाण वाशिम जिल्हा प्रतिनिधी ,उल्हास राठोड तालुका संघटक, यांच्या नेतृत्वामध्ये आरणी  तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजिस्टर नंबर एनजीपी 56 92 मध्ये जाहीर प्रवेश केला असून तेथील तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी आर्णी तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.