संगमेश्वर : तालुक्यातील करंबेळे येथील अवघड वळणावर बस आणि इर्टिगा कार यांच्यात सकाळी अपघात झाला. या अपघातात एस. टी. बस मधील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहे. तर इर्टिगामधील ड्रायव्हर एअरबॅगमुळे बचावला. हा अपघात सकाळी १० वा. च्या सुमारास घडला.

सविस्तर वृत्त असे की, देवरुखहून संगमेश्वरच्या दिशेने एस. टी. बस चालक अजिभीत जाधव प्रवाशांना घेवून निघाले होते. करंबेळे घाटी येथील अवघड वळणावर मुंबईहून देवरुखला जाणाऱ्या इर्टिगा कार बसला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. एस. टी. बस मधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 1 इसम, 1 तरुणी आणि एक वृध्द महिलेचा समावेश आहे, तर इर्टिगा कारमधील २ दोघेजण एअरबॅग असल्यामुळे बालबाल बचावले आहेत. नातेवाईकांच्या कार्यासाठी जात असताना करंबेळे घाटीत इर्टिगा चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाला असे बोलले जात आहे. मात्र एस. टी चालकाने इर्टिगाला वाचवण्याचा प्रयत्न करत गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र उजव्या बाजूला कार धडकली असे समजते.