तळेगाव ढमढेरे ते नगर रोड ला जाणारा बाह्यमार्गावर वेळनदी वरील पूल  पुराच्या पाण्याने वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक पाच ते सहा दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती. ग्रामपंचायत व प्रशासनाने वेळीच दखल घेऊन नदीवरील पूलावर जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकून पूल पूर्ववत करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.