छत्रपती संभाजीराजे,पोलीस अधीक्षक,सीएस,ग्रंथालय सेना प्रदेश अधाक्ष विजय पोकळे,भागवत वैद्य पत्रकार,यांची उपस्थिती.
बीड (प्रतिनिधी) दीपावलीच्या निमित्ताने बीड शहरातील गरीब कुटुंबातील तील चारशे कुटुंबांना प्रयास फाउंडेशन मुंबई व गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीडच्या वतीने मोफत किराणा किट वाटप करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजी राजे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सी एस. डॉ. सुरेश साबळे, विजय पोकळे, भागवत वैद्य , संतोष सोनी, विविध वर्तमानपत्राचे पत्रकार व कार्यक्रमाच्या प्रमुख समाजसेविका सीमा मनोज ओस्तवाल यांच्या हस्ते गरीब कुटुंबातील महिलाना , होतकरू, गरजु,विधवा महिला, अशा कुटुंबातील महिलांप्रमुखांना आज मा वैष्णवी पॅलेस येथे मोफत किराणा किट शिस्तप्रिय अशा पद्धतीत वाटप करण्यात आले
बीड शहरातील आतापर्यंत अनेक होतकरू महिला, मुली गोरगरीब,होतकरू महिला व कुटुंबांना. आधार देत. गुरु आनंद महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक वेळा गरिबांच्या अडचणींना धावून गेलेले आहे. आज बीड शहरातील तब्बल चारशे कुटुंबातील गरजू महिलांना मोफत किराणा किट वाटप मान्यवरांच्या हस्ते केले. या किराणा किटमध्ये प्रामुख्याने. मूग डाळ, चनाडाळ, साखर,तेल, इतर साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले संभाजी राजे भोसले, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सी एस डॉक्टर सुरेश साबळे, यांनी या उपक्रमाचे तोंड भरून आयोजनाचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक यांनी प्रस्ताविक भाषण देत असताना प्रयास फाउंडेशन मुंबई व गुरु आनंद महिला प्रतिष्ठान च्या गेल्या दहा-बारा वर्षांपासून विविध उपक्रम राबवत अनेक महिला गरजूंना आम्ही मदत आणि आधार देण्याचं कार्य करत आहोत यापुढेही तेवढ्याच ताकतीने आम्ही कार्य करत राहू व गोरगरिबांची सेवा करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला. हा उपक्रम वैष्णवी पॅलेस येथे मोफत किराणा किट वाटप करताना शिस्तप्रिय नियोजितबद्ध असा हा उपक्रम झाला.
दीपावलीच्या तोंडावर आपल्याला मोफत किराणा किट मिळाल्याने प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या कार्यक्रमाचे नियोजन मनोज ओस्तवाल, व त्यांच्या सर्व टीमने निवेद्यबद्ध केले.